ओळख लपूवन सोलापूरपासून 900KM अंतरावर राहिले पती-पत्नी! भीशीतून 131 जणांना 2.69 कोटींचा गंडा; आंध्रप्रदेशात १५ महिन्यांपासून चालवत होते भजी स्टॉल

सोलापुरात चिप्स, वेफर्सचा व्यवसाय करणाऱ्या चिप्पा पती-पत्नीने पुढे भीशी चालवली. फायनान्स कंपनी काढली आणि लोकांकडील पैसे जमा केले. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर चिप्पा पती-पत्नी आंध्रप्रदेशात पसार झाले. त्यांनी क्राईम पेट्रोल, यु-ट्यूबवरील व्हिडिओ पाहिले आणि पोलिस आपल्याला पकडणार नाहीत, याची खबरदारी घेतली होती.
solapur
cashsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील १३१ ठेवीदारांना चिप्पा दांपत्याने एक कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांना गंडा घातला होता. लोक पैसे मागू लागले आणि पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर १५ महिन्यांपूर्वी सोलापूरमधून ते पळून गेले होते. त्या भिशी चालक पती-पत्नींना सोलापूर शहर पोलिसांनी ९०० किमी दूरवरील आंध्रप्रदेशातील लक्खावरम गावातून जेरबंद केले आहे.

१ नोव्हेंबर २०२० ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान भिशी चालवून विश्वास संपादन केला. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीचे व्याज मिळवून देतो म्हणून आमिष दाखविले. श्री ओम साई फायनान्स सुरू करून त्याच्या माध्यमातून १३१ ठेवीदारांकडून दोन कोटी ६९ लाख १९ हजार रुपये घेतले. काही महिन्यांपर्यंत ठेवीदारांना नियमित व्याजाचा परतावा दिला, पण कालांतराने तो परतावा बंद केला. त्यावेळी काहींनी मुद्दल मागितले आणि चिप्पा पती-पत्नींनी पैसे दिले नाहीत. त्यावरून शिवाजी लक्ष्मण आवार (रा. साईबाबा चौक, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर रमेश अंबादास चिप्पा व पत्नी सुजाता चिप्पा (दोघेही रा. खुशी रेसिडेन्सी, गीता नगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध ५ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही पळून गेले होते. १५ महिन्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या पती-पत्नीला शोधून काढले. न्यायालयाने दोघांनाही १७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निरगुडे यांच्या नेतृत्वातील सहायक फौजदार अंबादास चव्हाण, पोलिस हवालदार पिंटू चव्हाण, रेश्मा वाकडे, तौसिफखान पठाण, रूपाली कोकरे, सायबर पोलिस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

क्राईम पेट्रोल, यु-ट्यूबचे व्हिडिओ पाहिले अन्‌...

सोलापुरात चिप्स, वेफर्सचा व्यवसाय करणाऱ्या चिप्पा पती-पत्नीने पुढे भीशी चालवली. फायनान्स कंपनी काढली आणि लोकांकडील पैसे जमा केले. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर चिप्पा पती-पत्नी आंध्रप्रदेशात पसार झाले. त्यांनी क्राईम पेट्रोल, यु-ट्यूबवरील व्हिडिओ पाहिले आणि पोलिस आपल्याला पकडणार नाहीत, याची खबरदारी घेतली होती. जाताना मोबाईल नेले नव्हते, नातेवाईक नसलेल्या ठिकाणी राहायला गेले. त्याठिकाणी भजीचा स्टॉल सुरू केला. १५ महिने त्यांनी ऑनलाइन व्यवहार टाळले. पण, खबरी व सायबर शाखेच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहर पोलिस त्यांच्यापर्यंत पोचलेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com