'दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा सल्ला मीच दिला' 

वृत्तसंस्था
रविवार, 17 मार्च 2019

पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे? तेव्हा मी त्यांना सांगितले, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा. 

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे (चाकण) : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे? तेव्हा मी त्यांना सांगितले, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

चाकण येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा मी सल्ला दिला. पण तेव्हा पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री बैठकीला उपस्थित नव्हते. गृहमंत्र्यांनी ही बैठक घेतली. आम्ही हा प्रश्न विचारला तर पंतप्रधान महाराष्ट्रात होते. इथे म्हणतायेत 'मैं चौकीदार हू, देश की सुरक्षा मेरे हात में है'. कुछ होने नहीं दुगा. आता ही 56 इंचाची छाती गेली कुठे'?

तसेच ते पुढे म्हणाले, पंतप्रधान यवतमाळमधील पांढरकवडामध्ये गेले. मात्र, जवळच असलेल्या जवानांच्या पार्थिवाला शेवटचा निरोप द्यायला गेले नाहीत. पण आता 56 इंचाची छाती पुढे करतात. पाकिस्तानला इंदिरा गांधी यांनी हल्ले थांबविण्यास सांगितले होते. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याची भूमिका हे सरकार घेत नाही. असं झालं तर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. पण हे सरकार कर्जमाफी केल्याचं सांगत बसलंय. किती जणांची माफी झाली हे तुम्हीच पाहा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

तसेच या परिस्थितीत आपल्याला भीक मागून बरंच काही आयात करावं लागतंय. यामुळे आपली अब्रू वेशीवर टांगली जात आहे. 

देशात सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने 

अनेक आश्वासने दिली गेली. देशातील अन्नाचा प्रश्न सोडू शकत नाही, हे दुर्दैव आहे. देशात सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तेव्हा मी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग काम सोडून आणि सांत्वन करण्यासाठी पोहचलो. बळीराजांमुळे देश क्रमांक एकचा तांदूळ निर्यात करणारा देश झाला आहे. कर्जमाफी केली सांगतात, त्यातील 50 टक्के लोकांपर्यंत देखील रक्कम पोहचली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I advised to destroy terrorist places says Sharad Pawar