esakal | मला चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल काही बोलायचं नाही - रुपाली चाकणकर | Rupali chakankar
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh tweeted about Rupali admitting Chakankar in hospital

मला चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल काही बोलायचं नाही - रुपाली चाकणकर

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (ncp) प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांची नियुक्ती होईल अशी चर्चा आहे. नियुक्तीची अधिकृत घोषणा गुरुवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता भाजपच्या (Bjp) नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी एक ट्विट केलंय. त्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला याबाबत कोणतीच कल्पना नाही, असं सांगितलं. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खानला ठेवणार सामान्य कैद्यांसोबत

संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून उत्तम रित्या काम चालू आहे. मनाला समधान आहे, असे त्या म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या टि्वटबद्दल विचारले असता चाकणकर म्हणाल्या की, चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल मला काही बोलायचं नाही तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची कुठलीच कल्पना नाही असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: अभिनेत्री नोरा फतेही ED ने बजावलं समन्स

चित्रा वाघ यांनी काय टि्वट केलं आहे?

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असं टि्वट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

loading image
go to top