'मराठी' असल्याची लाज वाटतेय- महेश मांजरेकर

'मराठी' असल्याची लाज वाटतेय- महेश मांजरेकर

मुंबई- मराठी असल्याची लाज वाटत असल्याची खंत मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज व्यक्त केली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर समोर येते ते पुलंचेच नाव. त्यांच्या आयुष्यावर भाई हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र दुर्दैव हे की या सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही.

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती येत असताना त्याचे स्वागत व्हायला हवे. पुण्यातही त्यांच्यावरच्या सिनेमाला स्क्रीन्स मिळू नये ही लाज वाटण्याचीच बाब आहे. याचमुळे सिनेमाचे दिग्दर्शक मांजेरकर यांनी ही खंत व्यक्त केली आहे. हा फक्त पुलंवरच्या सिनेमाचा प्रश्न नाही तर मराठी सिनेमांमध्ये विविध वेगळे विषय मांडले जात असतानाही त्यांना न्याय मिळत नाही. त्याविरोधात कोणी आवाजही उठवत नाही, राज ठाकरे यांचा अपवाद वगळला तर एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही. तसे असते तर असे घडलेच नसते, एका आठवड्यानंतरही पुन्हा सिम्बा याच सिनेमाला महत्त्व दिले जाते आहे. एकाही मराठी नेत्याला याबाबत आवाज उठवावासा वाटत नाही, असेही महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे. 

सिम्बाच्या वितरकांचा दबाव चित्रपटगृहांच्या मालकांवर येत आहे त्यामुळे अनेकांनी भाई चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. वितरकांच्या दबावामुळे इच्छा असून चित्रपट दाखवता येत नाही अशा कोडींत मालक सापडल्याचं मांजरेकर यांनी म्हटले आहे. सिम्बा या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे मल्टिप्लेक्समध्ये एका आठवड्यानंतरही भरपूर शो आहेत. 150 ते 300 शो रोज मुंबई, पुण्यात पार पडत आहेत. अशात भाई या मराठी सिनेमाला मात्र अवघे 40 ते 50 शो देण्यात आले आहेत ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com