
मुंबई : शिवसेनेत फूट पाडल्यामुळं सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेसाठी टीकेचे धनी झालेले आहेत. त्यातच आता खासदार विनायक राऊत यांनी देखील शिंदेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना आमदार केल्याचा मला पश्चाताप होत आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. (I regret to made Eknath Shinde MLA says Vinayak Raut)
एकनाथ शिंदेंच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कोणीतरी तरी लिहून द्यायचं त्यानंतर ट्विट करायचं. स्वतःच्या हातानं त्यांना ट्विट करता येत का? याचा मला अभ्यास करावा लागेल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
मी जेव्हा ठाण्याचा संपर्क प्रमुख होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे हे सभागृहाचे नेते होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन शिवसेना नेते सतीश प्रधान यांना गुलाल लावला आणि एबी फार्म दिला होता. परंतू केवळ मी मध्यस्थी केली आणि बाळासाहेबांना सांगितलं की, सतीश साहेबांना खासदारी, राज्यसभा किंवा विधानपरिषद द्या. पण एक नवीन तरुण आहे, त्यांना तुम्ही विधासभेची उमेदवारी दिली तर ती उपयुक्त ठरेल. पण मला आज पश्चाताप होतोय की, हे माझ्या आयुष्यातील हे पाप झालं आहे. मी जर मध्यस्थी केली नसती तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली नसती, अशा कटू शब्दांत विनायक राऊत यांनी एकनाश शिंदे यांच्यावर टीका केली.
शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन भाजप सोबत जात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. शिंदे गटाच्या बंडामुळं महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलं तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.