Chhagan Bhujbal : मी 'त्याचा' अभ्यास करतोय; अजित पवारांच्या संभाजी महाराजांवरच्या वक्तव्यावर भुजबळ स्पष्टच बोलले

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal Newsesakal
Summary

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे.

Chhagan Bhujbal News : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका करत ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे.

Chhagan Bhujbal News
Sanjay Raut : भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व मान्य नाही का? संजय राऊतांचा थेट सवाल

यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण पती पालक होते. म्हणजेच, गो ब्राम्हण पती पालक प्रमाणं ब्राम्हणांचं पालक मान्य आहे; पण कुणबी, शिवा काशिद असेल दलित समाजाचे पालक नव्हते का? असा सवाल भुजबळांनी उपस्थित करुन अजित पवारांच्या संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याबद्दल अभ्यास करून बोलेन, असं स्पष्ट केलंय.

Chhagan Bhujbal News
Vladimir Putin : ओडिशात चाललंय काय? पुतीन यांच्या देशातील आणखी एका नागरिकाचा मृत्यू, जहाजात सापडला मृतदेह

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या नायगाव या जन्मगावी छगन भुजबळांनी भेट देत फुलेंना अभिवादन केलं. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. अजित पवारांच्या विधानावर मी आताच बोलणार नाही. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, त्यामुळं मी आता काही बोलणार नाही. मी याचा अभ्यास करतोय. छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण पती पालक होते. म्हणजेच, गो ब्राम्हण पती पालकप्रमाणं ब्राम्हणांचं पालक मान्य आहे; पण कुणबी, शिवा काशिद असेल दलित समाजाचं पालक नव्हतं का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com