Sanjay Raut : भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व मान्य नाही का? संजय राऊतांचा थेट सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut news

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे.

Sanjay Raut : भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व मान्य नाही का? संजय राऊतांचा थेट सवाल

मुंबई : आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तेही (BJP) स्वत:ला प्रखर हिंदुत्ववादी मानतात. याचा अर्थ असा नाही की, दुसऱ्या धर्माचा आदर करु नये. राष्ट्रीय अध्यक्षांनी जर एखादा दर्गा किंवा मशिदीत जावून चादर चढवली असेल, तर त्याचा फार मोठा बोभाटा करण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे माफीवर होते का? असा सवाल करत राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जुने-पुराणे इतिहासातील नेते होते. आता त्यांचं महत्व नाही, हे भाजपला मान्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Siddheshwar Swami : चालता बोलता 'देव' गेला! सिद्धेश्वर स्वामींचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास शिवरायांपासून सुरु होतो आणि तिथंच संपवतो. इतर राज्यांना भूगोल आहे. मात्र, महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास यासाठी आहे. कारण, इथं छ. शिवाजी महाराज जन्माला आले. जर हाच इतिहास भाजपच्या राज्यपालांना मान्य नसेल, तर यावर भाजपनं आपलं मत स्पष्ट करावं, असं आव्हान त्यांनी केलं.