
IAS Tukaram Munde Transfer: अंगभूत कर्तव्यनिष्ठा आणि त्यामुळे सातत्याने होणाऱ्या बदल्यांमुळे तुकाराम मुंढे चर्चेत असतात. आयुष्यात एकदा नोकरी लागली आणि तीही आयएएस किंवा आयपीएस असेल तर अधिकारी निश्चिंत असतात. आयुष्यात पुन्हा कुठला संघर्ष नको, अशाच सर्वांच्या भावना असतात. पण काही अधिकारी याला अपवाद ठरतात. त्यातलेच एक म्हणजे तुकाराम मुंढे. मुंढे जिथे जातील तिथली सगळी कार्यालयं सुतासारखी सरळ होतात. त्याचा दबदबा, करारी बाणा आणि कर्तव्यनिष्ठा.. यामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होतात.