Shrimant Kokate: "हर हर महादेव चित्रपट बाजीप्रभुंनी पाहिला तर ते निर्माता अन् दिग्दर्शकाचा कडेलोट करतील" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrimant Kokate: "हर हर महादेव चित्रपट बाजीप्रभुंनी पाहिला तर ते निर्माता अन् दिग्दर्शकाचा कडेलोट करतील"

Shrimant Kokate: "हर हर महादेव चित्रपट बाजीप्रभुंनी पाहिला तर ते निर्माता अन् दिग्दर्शकाचा कडेलोट करतील"

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण काढली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी केली होती. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली आहेत. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. याबाबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी आपलं प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण काढली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी केली होती. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली आहेत. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. याबाबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी आपलं प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर येताच राऊतांनी केलं फडणवीसांचं कौतुक, मोदी- शाहांची भेटही घेणार

कोकाटे म्हणाले की, अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याच्या कबरीसाठी जागा दिली होती. त्यामुळे कबर हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही पण त्या कबरीच्या आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम उभे करण्यात आले होते ते पाडणं गरजेचे होतं. आधीच्या सरकार ने ते केले पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही मात्र या सरकारने हे काम केलं त्यामुळे त्यांचे कौतुक. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष धार्मिक नसून राजकीय होता असंही पुढे ते म्हणालेत.

हेही वाचा: Sanjay Raut : "सावरकर, लोकमान्य टिळकांप्रमाणे मीही जेलमध्ये एकांतात होतो"

हर हर महादेव चित्रपटाबाबत बोलताना ते म्हणाले की, हर हर महादेव या चित्रपटावर बंदी आणली पाहिजे. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे डोक्यातील विकृती माध्यमात आणणे असं नाही. हा चित्रपट शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांचा अवमान आहे. बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात लढाई केली याचा काय पुरावा आहे, या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केला जात आहे. जर स्वतः बाजीप्रभू यांनी हा चित्रपट पाहिला तर पहिले ते निर्माता आणि दिग्दर्शकाचा कडेलोट करतील असंही पुढे ते म्हणालेत.

टॅग्स :movie