...तर मुंबईत लागू होईल लॉकडाऊन; पालिका आयुक्त चहल यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

...तर मुंबईत लागू होईल लॉकडाऊन; पालिका आयुक्त चहल यांचा इशारा

मुंबई : मुंबईतील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) चहल यांनी लॉकडाऊनबाबत (Lock Down In Mumbai ) मोठं विधान केले आहे. ते म्हणाले की, जर मुंबईमध्ये दररोज 20,000 च्या पुढे कोरोना रूग्ण आढळून आल्यास शहरात लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. एनडी टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या आढळून येणाऱ्या दैनंदिन रूग्णांपैकी 80 टक्के रूग्ण हे ओमिक्रॉनचे (Omicron Cases In Mumbai ) असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत ओमिक्रॉनचा प्रसार मुख्यत्वे जोखीम नसलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे होत Dmtv, गेल्या 35 दिवसांत जवळपास 2,00,000 प्रवासी जोखीम नसलेल्या देशातून मुंबईत आले Eusl. यातील बरेच जण ओमिक्रॉन व्हायरसचे वाहक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Maharashtra Omicron News In Marathi )

हेही वाचा: राज्यात सक्रिय रुग्णांची झपाट्याने वाढ; 40 हजारांचा टप्पा पार!

ते म्हणाले की, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांशी (Maharashtra CM) चर्चा करण्यात आली असून, सध्या प्रशासन कडक निर्बंध (Strict Rules Imposed In Mumbai) लावण्याच्या विरोधात आहे. मात्र, जर दिवसाला 20,000 पेक्षा अधिक रूग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन सारख्या कठोर निर्बंधांचा विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या शहरात 30 हजार बेड उपलब्ध असून यातील 10 हजार बेड दररोज व्यापले गेल्यास परिस्थिती हातळणे अवघड होईल.

हेही वाचा: कोविडग्रस्त महिलेला दिला व्हायग्राचा डोस; कोमातून आली बाहेर

सध्या आढळून येणार्या रूग्णांपैकी 80 टक्के रूग्ण ओमिक्रॉनची (Omicron) लागण झालेले असून ही आकडेवारी येत्या काही दिवसांत 90 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असल्याचे चहल म्हणाले. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात 67 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली असून ही आकडेवारी देशातील सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर विशेषतः राजधानी मुंबईत कोविड रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (Covid Cases In Maharashtra) रविवारी राज्यात 11,877 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली जी शनिवारच्या तुलनेत 29 टक्क्यांनी जास्त असून नवीन संसर्गांपैकी 8,063 रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: If Mumbai Record Daily 20000 Covid Cases Then We Have To Imposed Strict Rules Says Iqbal Singh Chahal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top