...तर मी आमदारकीचा राजीनामा देईन: जारकीहोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Satish Jarkiholi

...तर मी आमदारकीचा राजीनामा देईन: जारकीहोळी

बेळगाव : ‘हिंदू’ शब्द व धर्माबाबत केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी समिती स्थापन करावी, त्या समितीने माझे वक्तव्य चुकीचे असल्याचा अहवाल दिला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निपाणी येथे मानव, बंधुत्व वेदिके या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात जारकीहोळी यांनी हिंदू शब्द व धर्माबाबत चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यासंदर्भात जारकीहोळी यांनी भूमिका मांडली. ‘आपण जे बोललो, ते बाजूला ठेवून भलत्याच विषयावर चर्चा केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून चौकशी करावी, असेही जारकीहोळी म्हणाले.