%20-%20Copy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20-%20Copy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तात्या लांडगे
सोलापूर : पती सतत मारहाण करतो, सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होतोय, गावात हातभट्टीची विक्री होते, जमिनीची मोजणी, वाटणी होऊनही शेजारच्यांकडून त्रास दिला जातो, गावातील सावकार त्रास देत आहे, अशा सामान्यांच्या तक्रारी असतात. स्थानिक पोलिसांत तक्रार करूनही अपेक्षित न्याय मिळत नाही. अशा सामान्यांना आता प्रत्येक शनिवारी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्वत: भेटणार आहेत. सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी जनता दरबार सुरू केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ पोलिस ठाणी आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये दररोज शेकडो तक्रारी दाखल होतात. पण, पोलिस ठाण्यात धाव घेऊनही प्रत्येकाला अपेक्षित न्याय मिळतोच असे नाही. त्यामुळे त्या सामान्य व्यक्तीस, महिलेस पोलिस अधीक्षकांना भेटण्याची इच्छा असते. मोठ्या साहेबांना भेटल्यावर आपल्याला नक्की न्याय मिळेल, अशी त्यांना आशा असते. सामान्यांची ही गरज ओळखून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनता दरबार सुरू केला आहे.
यावेळी संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, भरोसा सेलचे अधिकारी, अंमलदार, समुपदेशक असतात. यावेळी कौटुंबिक छळणारे, अवैध हातभट्टी विक्रेते, खासगी सावकारांकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र लिहून घेतले जाते. तक्रारदारांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या संकेतस्थळावर थेट तक्रार करता येते. याशिवाय आता नव्याने सुरू केलेल्या ‘न्याय संवाद ॲप’च्या ८६९८० ४०५४२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर देखील सामान्य नागरिक तक्रार करू शकतात, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
सामान्यांच्या प्रश्नांवर जनता दरबार
पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार करून देखील समाधानकारक न्याय न मिळाल्याच्या तक्रारी असतात. जमिनीचा वाद, कौटुंबिक वाद, सावकारांकडून छळ, अशा तक्रारी सामान्य लोकांच्या असतात. त्यांच्यासाठी आपण जनता दरबार सुरू केला आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी अशा तक्रारदारांसाठी मी स्वत: वेळ देतो. त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांची तक्रार सोडविण्यात येते.
- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
दूर अंतरावरील तालुक्यातच जनता दरबार
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, सांगोला, माळशिरस, बार्शी या तालुक्यांतील तक्रारदारांना सोलापूरमध्ये येणे प्रत्येकवेळी शक्य होत नाही. या तालुक्यातील तक्रारदारांसाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्वत: त्या तालुक्यातील पोलिस ठाण्यात किंवा पोलिस उपअधीक्षक कार्यालयात जातात. त्या ठिकाणी तक्रारदारांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून पोलिस अधीक्षक तक्रारदारास न्याय देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.