

IIT Bombay Student Tragedy
esakal
मुंबई : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी (ता. १८) संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केल्याचे आढळल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले होते; त्यानंतर तो वसतिगृहात मृतावस्थेत आढळल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. या विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी प्रशासनाने पोलिस आणि इतर सुरक्षा दलाची मदत घेतली.