क्रूझ ड्रग्स प्रकरण : आणखी एका पंचाचे एनसीबीवर गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCB

क्रूझ ड्रग्स प्रकरण : आणखी एका पंचाचे NCB वर गंभीर आरोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गेल्या 2 ऑक्टोबरच्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Cruise Drugs Case) आणखी एका पंचाने एनसीबीवर (NCB) आरोप केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर आणि सीलबंद लिफाफ्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा: राज्यातील सहाही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार?

पंच सोनू म्हस्के याने एनडीपीएस कायद्यांतर्गत विशेष न्यायालयासमोर शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्याने एनसीबीवर आरोप केले आहेत. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि अटक करण्याची धमकी देऊन हिंदी भाषेतील चार कागदपत्रं आणि काही कोऱ्या कागदांवर सह्या करण्यास भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक केल्यानंतर ५ ऑक्टोबरला याच प्रकरणाशी संबंधित एनसीबीने आचित कुमारच्या घरावर छापेमारी केली होती. त्याच्या घरातून अंमली पदार्थ मिळाल्याचा दावा एनसीबीने केला होता. आचितच्या अटकेनंतर, अॅडव्होकेट अश्विन थूल यांनी पंचनामा प्रक्रियेदरम्यान अनियमितता आणि NCB अधिकार्‍यांनी आचितला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता.

म्हस्के (३७) हे आचितच्या इमारतीत सुविधा व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी वकील अजय भिसे यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ''5 ऑक्टोबर रोजी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने स्वत:ची ओळख एनसीबी अधिकारी म्हणून दिली आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना फ्लॅटवर बोलावले होते. असे न केल्यास खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याने दिली होती'', असे आरोप पंच म्हस्केने केले आहेत.

loading image
go to top