राज्यातील सहाही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavikas aghadi and bjp

राज्यातील सहाही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका (Maharashtra Legislative Council Election 2021) होऊ घातल्या आहेत. पण, राज्यातील सहाही विधान परिषदेच्या या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJO) अनुकूल असून तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी दिला आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असून दुपारी निर्णय होणार आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी माहिती दिलीय.

हेही वाचा: प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांची घोषणा झाली, तसेच काँग्रसने देखील उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने नागपुरातून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराला संधी दिली. तसेच कोल्हापुरातून भाजपकडून अमल महाडीक यांना संधी दिली. अमल महाडिकांना टक्कर देण्यासाठी सतेज पाटील आहेत. पण, कोल्हापूर आणि नागपूरची निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. त्यानुसार नागपूर हे भाजपच्या ताब्यात असेल, तर कोल्हापूर काँग्रेसच्या ताब्यात जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

अकोला,बुलडाणा आणि वाशिममधून भाजपने वसंत खंडेलवाल आणि धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांना उमेदवारी दिली आहे, तर मुंबई महापालिकेतून दोन जागा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आहेत. यात शिवसेनेने सुनील शिंदेंना उमेदवारी दिली आहे. आता या सर्व निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण, या मतदारसंघाविषयी सध्या चर्चा सुरू आहे.

loading image
go to top