
मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाआधी अवकाळीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरात वीजांच्या कडकाडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. आता येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात गुरुवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.