Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ 36 तासात आणखी तीव्र होणार! महाराष्ट्रासह चार राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

'बिपरजॉय' चक्रीवादळ अधिकाधिक प्रभावी होताना दिसून येत आहे
Cyclone Biparjoy:
Cyclone Biparjoy: esakal

'बिपरजॉय' चक्रीवादळ अधिकाधिक प्रभावी होताना दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला असून पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार असल्याचीही माहीती आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात न जाण्याचा असा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

बिपरजॉय पुढील ३६ तासांत आणखी तीव्र होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागामध्ये 50 ते 60 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहत आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे.(Latest Marathi News)

Cyclone Biparjoy:
Monsoon Update: एल-निनो सक्रिय! यंदा दुष्काळाची भीती, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

बिपरजॉय या चक्रीवादळाचा परिणाम भारतासह ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.(Marathi Tajya Batmya)

Cyclone Biparjoy:
Shirdi News : साईसंस्थानमधील ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय; ४० टक्के मिळाली वेतनवाढ

बिपरजॉय चक्रीवादळ आता पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे पुढे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याचा परिणाम किनारी भागावर होऊ शकतो.(Latest Marathi News)

Cyclone Biparjoy:
Partygate प्रकरण : बोरिस जॉन्सन यांचा खासदार पदाचाही राजीनामा; तडकाफडकी घेतला निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com