Sharad Pawar I देशातील जनता सुजाण, राज्यकर्ते चुकल्यास धडा शिकवते - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

'लोकशाही असलेल्या देशात लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होतंय'

देशातील जनता सुजाण, राज्यकर्ते चुकल्यास धडा शिकवते - शरद पवार

पुरंदर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही आपली जमेची बाजू आहे. संविधानाने देशाला एकसंध ठेवल आहे, असे असूनही लोकशाही असलेल्या देशात लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होतं आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. देशातील जनता सुजाण आहे, राज्यकर्ते चुकल्यास ती योग्य तो धडा शिकवते, असा खोचक टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला आहे. आज ते पुण्यातील पुरंदर येथे बोलत होते.

शरद पवार यांनी साताऱ्यातील भाषणात सादर केलेल्या पाथरवटाच्या कवितेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळातून पवारांवर टीका होत आहेत. यादरम्यान, आज पत्रकारांशी संवाद साधताना शरज पवार यांनी पुन्हा एकदा जवाहर राठोड यांच्या त्या कवितेचं वाचन केलं आहे. या कवितेतून कष्टकऱ्यांच्या वेदना मांडण्याचा राठोड यांचा प्रयत्न होता, अंसही त्यांनी स्पष्ट केलं आहे

हेही वाचा: 'नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, ते कोणत्या पक्षातून आले? अजित पवारांचा टोला

श्रीलंका आणि पाकिस्तानातील राजकीय अराजकतेवर पवारांनी बोट ठेवलं आहे. ते म्हणतात, डॉ. बाबासाहेबांनी लिहलेली घटना ही देशासाठी जमेची बाजू आहे. संविधानाची भक्कम चौकट असल्याने देशातील लोकशाही संकटात येत नाही. बाबासाहेबांच्या घटनेमुळे देश एकसंघ राहिला आहे. आणि हीच राज्यघटना ही जमेची बाजू आहे.

पुढे ते म्हणाले, जनता सुजाणा आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयानंतर जनेतेनं त्यांचे सरकार पाडले. त्यानंतर देशाची सुत्रे मोरारजी यांच्याकडे सोपवली गेली. मात्र दोन वर्षांच्या आत त्यांचंही सरकार जनतेनं पाडलं. जनता सुजान आहे, नेते, राज्यकर्ते चुकल्यास जनता त्यांना धडा शिकवते, असंही ते म्हणाले आहेत. पुरंदरचा विमानतळ उपयुक्त आहे. त्याचे काम पूर्ण करावे. त्यामुळे पुणे आणि साताऱ्यासाठी सोयिस्कर होईल, असंही त्यांनी सुचवलं आहे.

हेही वाचा: राज्यात पावसाला सुरुवात, कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात 'अलर्ट'

Web Title: Sharad Pawar Reaction On Social Media Viral Video Criticized To Opposition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top