
तात्या लांडगे
सोलापूर : आठ- दहा वर्षांच्या चिमुकल्यांनी जन्मदात्या आईला नको त्या अवस्थेत दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिले आणि त्यांनीच पोटच्या गोळ्याला संपविले. मागील दीड वर्षात माढा तालुक्यात अशा दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात वडिलाने अशाच कारणातून पोटच्या मुलीला संपविले आहे. आपले अनैतिक संबंध कायम सुरू राहावेत, त्याबद्दल बाहेर वाच्यता होऊ नये, यासाठी जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या निष्पाप चिमुकल्यांचा घात केला. त्यामुळे आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
धक्कादायक ‘या’ तीन घटना...
१) आईसोबतच मुलाचे अफेअर अन् वडिलाकडून मुलीचा खून
कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील एका दांपत्यास दोन मुली व एक मुलगा होता. पत्नी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आली होती. छोटा मुलगा व दुसऱ्या नंबरची मुलगी त्या विवाहितेच्या माहेरी होते. आठ वर्षाची मुलगी शाळा बुडू नये म्हणून वडिलांकडेच थांबली होती. मे महिन्यातील एका रात्री आजोबाजवळ झोपलेली ती चिमुकली उठली आणि वडिलांच्या खोलीकडे जायला निघाली. दरवाजा उघडताच आजी आणि वडील नको त्या अवस्थेत एकाच अंथरुणात दिसले. मुलगी आपल्या आईसोबतचे अनैतिक संबंध बाहेर कोणाला तरी सांगेल म्हणून बापानेच त्या चिमुकलीचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल असून, संशयित आरोपी तुरुंगात आहे.
-------------------------------------------------------------------------
२) अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईनेच चिरला चिमुकल्याचा गळा
कव्हे (ता. माढा) येथील विवाहितेचे माहेरी एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. सहा वर्षाच्या चिमुकल्याने माहेरी आलेल्या आईला त्या तरुणासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. तेथून पुन्हा सासरी आलेल्या त्या विवाहितेला आपला लहान मुलगा त्याच्या वडिलांना अफेअरबद्दल सांगतो की काय, याची भीती वाटत होती. २६ फेब्रुवारी २०२४ मध्ये त्या आईने पोटच्या सहा वर्षाच्या गोळ्याला गळा दाबून मारले. तो जिवंत राहू नये म्हणून त्याचा गळा चिरला आणि कुऱ्हाडीने त्याचे मुंडके धडावेगळे केले. काहीवेळाने तिनेही गळफास घेऊन व औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या ती जेलमध्ये आहे.
-------------------------------------------------------------------------------
३) आई अन् चुलत भाऊ एकाच अंथरुणात, मुलगा सांगेल म्हणून त्यालाच संपविले
पती मद्यपी आणि पत्नीची अपेक्षा, यात ताळमेळ बसत नसल्याने चुलतीने दिराच्या मुलासोबतच अफेअर सुरू केले. २५-२६ वर्षाच्या तरुणाची इच्छा घरातच पूर्ण होत होती. चुलती आणि पुतण्या असल्याने त्यांच्यावर कोणाचाही संशय नव्हता. दोघांचे अफेअर सुरळीत सुरू होते. पण, एकेदिवशी त्या विवाहितेच्या १० वर्षाच्या मुलाने चुलत भावाला आपल्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. आपले पितळ उघडे पडणार, याची त्या दोघांनाही भीती वाटत होती. त्या तरुणाने १० वर्षाच्या चुलत भावाला संपविण्याचा प्लॅन आखला आणि अन्य साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केला. माढा तालुक्यातील ही घटना असून, टेंभुर्णी पोलिस सखोल तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.