esakal | बैल पोळा विशेष 2021 :सर्जा-राजाचा ‘पोळा'! जाणून घ्या महत्व
sakal

बोलून बातमी शोधा

pola

सर्जा-राजाचा ‘पोळा'! शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पोळा किंवा बैलपोळा (Pola Festival 2021) हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला ज्या त्या प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा तसेच बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.

बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला....

बैल खूप कष्टकरी आहे. ते शेतीच्या कामासाठी राबत असतात. बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. सध्या शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळात शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर करायचे तसेच पूर्वीच्या काळी मोटार वाहने नसायचे तेव्हा बैलगाडीचा वापर केला जात असे. या काळात बैलांनी शेतकऱ्यांना मोठी साथ दिली. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्याचे आभार मानायचे म्हणून हा सण साजरा केला जातो. पोळा किंवा बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. हा सण शेतकरी बांधव साजरा करतात. हा सण प्रामुख्याने मध्य प्रदेश,छत्तीसगड,आणि महाराष्ट्रात साजरा करतात. या सणाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे. तेलंगणात याला 'पुलाला अमावस्या '' म्हणतात.तर काही ठिकाणी बेंदूर असे म्हणतात. दक्षिण भागात मट्ट पोंगल आणि उत्तर व पश्चिम भागात याला गोधन असे म्हणतात.

बैलपोळा - पिठोरी अमावस्या

बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून बैलांची पूजा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध वस्तुंनी सजवतात. गळ्यात सुंदर घंटा, पायात घुंगरू, शिंगाना रंगवतात. माळी, विविध वस्तुंनी आपल्या बैलांना सजवतात... नटवतात... हा सण पावसाळ्यात पेरणी संपल्यावर साजरा करतात. बैलांना सजवून सर्व शेतकरी बांधव आपले बैल घेऊन गावातील मंदिराजवळ एकत्र होतात. तिथे त्या बैलांची यथोचित पूजा करतात, त्यांना नेवेद्य देतात.

बैलांप्रती कृतज्ञता

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळा सण यावर्षी 6 सप्टेंबर रोजी आहे. पिठोरी अमावस्येच्या (Pithori Amavasya 2021) दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

बैलपोळ्याचे महत्त्व..

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा असते.

स्त्रोत - वेबदुनिया, इंडिया.कॉम, विकिपीडिया

loading image
go to top