शिवसेनेला 13 तर मित्रपक्षांना चार; प्रमुख खाती भाजपकडेच?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 October 2019

शिवसेनेला गृह, वित्त, महसूल किंवा नगरविकास ही चारही महत्वाची खाती देण्यास भाजपने नकार दिला आहे.

मुंबई : शिवसेनेला गृह, वित्त, महसूल किंवा नगरविकास ही चारही महत्वाची खाती देण्यास भाजपने नकार दिला आहे. निवडून आलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपने 26 खाती स्वत:कडे ठेवत सेनेला 13 आणि मित्रपक्षांना 4 खाती देऊ केली आहेत. तसेच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना चर्चेत स्थान दिले तर ते नाकारण्याचा भाजपचा पवित्रा आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास भाजप तयार नाही. त्यातच आता गृह, अर्थ यांसारखी चार महत्त्वाची खाती देण्यासही भाजपची तयारी नाही.

दरम्यान, युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, यावर रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजप तयार नसल्याचे दोन दिवसांपूर्वी प्रभारी सरोज पांडे यांनी स्पष्ट केले होते. भाजपचे अन्य नेतेही भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा करीत आहेत. या सर्व वातावरणामुळे युतीतील तिढा वाढल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Cabinet Ministry may with BJP