लॉकडाउनबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले? अमित देशमुखांनी दिली माहिती | Amit Deshmukh lockdown Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Deshmukh lockdown Updates

सध्या राज्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत आहे.

लॉकडाउनबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

Maharashtra Corona Omicron Updates : संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडं लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपलीय. सध्या राज्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत असून मंगळवार व बुधवारी कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) तब्बल 19 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडलीय. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आज वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी विभागाचे सचिव, संचालय यांच्याकडून कोरोनाबाबत आढावा घेण्यात आल्याचे राज्याचे मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितले. (Amit Deshmukh lockdown Updates)

हेही वाचा: विजेच्या धक्क्यानं 333 हत्तींचा मृत्यू; Supreme Court ची नोटीस

देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्रात तूर्तास लाॅकडाउनची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय. परंतु, आपल्याला यावरती कोणते निर्णय घ्यावे लागतील याची चर्चा सुरुय. राज्यात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना (Doctor) कोरोनाची लागण झाली असून याची नोंद घेतली आहे. सध्या उपचार व्यवस्था आहे. मात्र, यात मार्डच्या मागणीबाबत चर्चा झाली असून त्यावर देखील आम्ही उपाय शोधू, तसेच सर्व संघटनांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याबाबत आम्ही भूमिका घेतलीय.

हेही वाचा: America : इमारतीला लागलेल्या आगीत 8 मुलांसह 12 जणांचा होरपळून मृत्यू

राज्यात बुस्टर डोसबाबत मोहीम सुरू करण्यात येणार आहे. शिवाय, रुग्णालयाच्या आवारात आयसोलेशन न करता इतर ठिकाणी देखील आयसोलेशनचा विचार करण्याचा आमचा विचार आहे. रुग्णसेवेत हलगर्जीपणा होणार नाही, याची देखील आम्ही काळजी घेत आहोत. दरम्यान, आयसीएमआरबाबत देखील माहिती घेण्यात आली असून दुसऱ्या लाटेत ज्या सूचना होत्या, त्या सूचना या लाटेत देखील देण्यात आल्या आहेत. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती मंत्री महोदय यावेळी देणार आहेत, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top