esakal | "सीएए' देशाच्या ऐक्‍यासाठी महत्त्वाचे पाऊल : डॉ. सहस्रबुद्धे 
sakal

बोलून बातमी शोधा

vinay-sahasrabuddhe

""नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हे देशाच्या ऐक्‍यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,'' असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

"सीएए' देशाच्या ऐक्‍यासाठी महत्त्वाचे पाऊल : डॉ. सहस्रबुद्धे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ""नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हे देशाच्या ऐक्‍यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,'' असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर भाजपतर्फे आयोजित "नागरिकत्व सुधारणा कायदा' या विषयावरील कार्यशाळेत डॉ. सहस्रबुद्धे मार्गदर्शन करीत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, प्रदेश चिटणीस राजेश पांडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. भाजपचे आमदार, माजी आमदार, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ""मानवतावादी दृष्टिकोनातून "सीएए'ची निर्मिती करण्यात आली आहे. विरोधी पक्ष त्याबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करीत आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकवाटप, संपर्क या माध्यमांतून सोप्या भाषेत नागरिकांना या कायद्याची माहिती देऊन जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे.'' मिसाळ यांनी स्वागत केले, तर राजेश पांडे यांनी प्रास्ताविक आणि गणेश घोष यांनी सूत्रसंचालन केले.

loading image