जरुरी है मेरा देश जलता रहे ! जलील यांची राज ठाकरेंच्या सभेवर प्रतिक्रिया | Imtiaz Jaleel Comment On Raj Thackeray Sabha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Imtiaz Jaleel

जरुरी है मेरा देश जलता रहे ! जलील यांची राज ठाकरेंच्या सभेवर प्रतिक्रिया

औरंगाबाद : सियासत के दुकानों में रोशनी के लिए जरुरी है मेरा देश जलता रहे !, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज ठाकरे यांच्या सभेनंतर दिली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावर गृहमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. भोंगे काढण्यास एक दिवस वाढवण्यात आला आहे. तरुणांना मशिदींसमोर जाऊन भोंगे लावा असे सांगून, तुम्ही अयोध्याला चालला आहात, अशी टीका जलील यांनी ठाकरेंवर केली. तरुणांची दिशाभूल करण्याचा, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या इशाऱ्यावरुन हे होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. (Imtiaz Jaleel Attacks On Raj Thackeray Sabha In Aurangabad)

सियासत नफरतो के जख्मों को भरने नहीं देता, जख्म भरने लगी तो वहा मख्खी बैठने लगी. एका वर्षांपूर्वी आपण कशासाठी भांडत होतो. ऑक्सिजन बेड ... आज आपण ऑक्सिजन, भाववाढ, रोजगारावर बोलत नाहीत. एक दिशा देण्याचे कामही तुमच्यावर आहे. खिलजीने कोणाला पळून नेले होते. ते आज सांगण्याची काय गरज आहे? मुस्लिम समाजाने काही विरोध करण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते पटो न पटो तो आदेश पाळावा लागेल. आम्ही कोणाचाही उल्लेख करत नाही. आम्ही डुप्लिकेट नाहीत. मी विरोध करणार नाही. संविधानावर चालणार हा देश आहे. माझ्यावरही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, असे जलील म्हणाले.

पोलिसांनी स्पष्टपणे विचारावे, की एकदा होऊ द्याच. पोलिस, प्रशासनाने कारवाई करावी. दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल. भोंग्यांबाबत आम्ही काही उत्तर देणार नाही. कोणत्याही जातीविषयी बोलणार नाही. पण ते बोललेत, असा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला परवानगी देताना घातलेल्या अटींवर बोट ठेवले.