Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Imtiaz Jaleel hosts mutton chicken party with invite to CM and officials : इम्तियाज जलील यांनी एक्स वर पोस्ट करून याबाबत स्वत: माहिती दिली आहे; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत जलील?
AIMIM EX MP Imtiaz Jaleel invites CM and officials to his Independence Day mutton-chicken party, sparking political buzz.
AIMIM EX MP Imtiaz Jaleel invites CM and officials to his Independence Day mutton-chicken party, sparking political buzz.esakal
Updated on

Imtiaz Jaleel’s Independence Day Celebration: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयावरून, राज्यातील राजकारणत तापलं आहे तर यावर उलसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयांच्या निषेधार्थ एक पाऊल उचललं आहे, ज्याबाबत त्यांनी एक्सवर पोस्टकरून माहितीही दिली आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.

इम्तियाज जलील यांनी या निर्णयांच्या निषेधार्थ म्हणून, १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी मटण आणि चिकन पार्टीचं आयोजन केलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी या पार्टीचं निमंत्रणं महापालिका आयुक्तांसह थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिलं आहे.  ज्यामुळे त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

इम्तियाज जलील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, १५ ऑगस्ट रोजी सर्व मांस आणि चिकणची दुकानं बंद ठेवण्याचे तुघलकी फरमान जारी करणाऱ्या सर्व महापालिका आयुक्तांना १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपासून माझ्या निवासस्थानी आयोजित चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीत सहभागी होण्याचे निमंत्रण.

AIMIM EX MP Imtiaz Jaleel invites CM and officials to his Independence Day mutton-chicken party, sparking political buzz.
Kapil Sharma Cafe Attack Interpol Investigation: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ला प्रकरणात आता ‘इंटरपोल’ची एन्ट्री!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या निमित्त उपस्थित राहतील.(भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र कोणतेही हुकुमशाहीशासित राज्य नाही) ज्यांना अद्याप स्वातंत्र्याचा अर्थ समजला नाही, त्या लोकांना आठवण करून देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली जात आहे.

AIMIM EX MP Imtiaz Jaleel invites CM and officials to his Independence Day mutton-chicken party, sparking political buzz.
Raj Thackeray : मांसविक्री, कत्तलखाने बंदीवरुन राज ठाकरे भडकले, म्हणाले- स्वातंत्र्यदिनीच लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय

याशिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही सरकारने लोकांनी काय खावे न खावे हे ठरवू नये. स्वांतत्र्यदिनीच आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com