राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी मांसविक्री आणि कत्तलखाने बंदीचा विरोध करून लोकांचे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावले जात असल्याची टीका केली.
त्यांनी महानगरपालिकेला अशा आदेश देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत लोकांना मांसविक्री चालू ठेवण्याचे आवाहन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा अशा निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचे आणि हा जुना 1988 चा जीआर असल्याचे स्पष्ट केले.
Meat Sale Ban: राज्यातील अनेक महापालिकांनी १५ ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही सरकारने लोकांनी काय खावे न खावे हे ठरवू नये. स्वांतत्र्यदिनीच आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.