Aurangabad Renaming Sparks Political Debate : इतिहासाचा मुद्दा पुढे करून एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल, तर पुण्याचे नाव बदलून फुलेवाडा आणि कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांच्या नावावर करावे, असे आव्हान AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिले आहे. तसेच, आपण मुस्लिम असल्याने लोक आपल्याला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.