esakal | भोसरी जमीन घोटाळा: एकनाथ खडसेच्या जावयाला १५ जुलैपर्यंत ED कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

NCP leader Eknath Khadse

भोसरी जमीन घोटाळा: एकनाथ खडसेच्या जावयाला १५ जुलैपर्यंत ED कोठडी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (ncp) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (girish chowdhary) यांना 15 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टानं तीन दिवसांची ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. मनी लाँड्रींग प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने 9 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणात मनी लाँड्रीग झाल्याचा ईडीचा आरोप आहे. (In bhosari land scam case Ncp leader Eknath khadses son in law girish chowdhary in ed custody till 15 th july)

पाच दिवसांपूर्वी ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्याने खळबळ उडाली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसी जागा खरेदी केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच या प्रकरणी झोटींग समिती देखील नेमण्यात आले होते. त्यावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागत होता. तसेच त्यानंतर श्री खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू देखील सुरू झाली.

हेही वाचा: ममताची हत्या की, आत्महत्या? वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ

भाजपावर खडसेंचे आरोप

एकनाथ खडसेंना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांचे अनेकदा भाजप नेत्यांसोबत खटके उडाले. त्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले. त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतांना तुम्ही ईडी लावल्यास आम्ही सिडी लावू असे श्री. खडसेंनी सांगितले होते. त्यामुळे आता एकनाथराव खडसे काय करतील, खरंच ते आता सिडी लावतील का ? काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून असणार आहे.

loading image