esakal | ममताची हत्या की, आत्महत्या? वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

ममताची हत्या की, आत्महत्या? वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ

ममताची हत्या की, आत्महत्या? वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ

sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा:- चार दिवसांपासून बेपत्ता (missing) असलेल्या विवाहित महिलेचा मृतदहे अखेर रविवारी सायंकाळी वसईच्या (vasai seaface) किल्लाबंदर समुद्र किनाऱ्यावर आढळला. ममता पटेल (mamta patel) (30) असे मृत विवाहितेचं नाव आहे. बुधवार पासून ती बेपत्ता होती. समुद्र किनाऱ्यावर ममताचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की, आत्महत्या (suicide) हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून , पोलीस याचा तपास करीत आहेत. (married women Mamta patel dead body found at vasai seaface)

ममता वसईच्या एव्हरशाईन परिसरातील रहायला होती. तिचे गुजरातमधील नावसारी हे मूळ गाव आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात ममता पटेलचा विवाह झाला होता. बुधवार सकाळी सहा वाजता वसई एव्हरशाईन परिसरात ती मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यानंतर ती घरी परातलीच नाही. नातेवाईकांनी पूर्ण परिसरात शोध घेतला. पण ती सापडली नाही.

हेही वाचा: भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? - संदीप देशपांडे

नालासोपारा पूर्व तुलिंज पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली होती. चार दिवसानंतर बेपत्ता महिलेचा वसई किल्लाबंदर समुद्र किनाऱ्यावर मृतदेह मिळाल्याने एकाच खळबळ उडाली आहे. एव्हरशाईन ते वसई किल्लाबंदर हे अंतर 15 ते 20 किलोमीटरचे आहे. दोन महिन्यापूर्वीच विवाह झालेली महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती.

हेही वाचा: लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

ममता किल्लाबंदर परिसरात कशी गेली?, तिला कुठले अमिष दाखवून तिकडे नेऊन तिची हत्या केली की ती स्वत: जाऊन आत्महत्या केली? याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन साठी पाठविला आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून विविहितेची हत्या की, आत्महत्या याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

loading image