विधानपरिषदेवर काँग्रेस दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीला संधी देणार? | Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीव-प्रज्ञा सातव

विधानपरिषदेवर काँग्रेस राजीव सातव यांच्या पत्नीला संधी देणार?

मुंबई: काँग्रेसचे विधानपरिषदतील (Congress mlc) गटनेते शरद रणपिसे (Sharad ranpise) यांच्या मृत्यूमुळे एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajeev satav) यांच्या पत्नी आहेत. या जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छूक होते.

मात्र प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्चित केले असल्याची सुत्रांची माहिती आहे. राज्यसभेचे खासदार असलेले राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला सक्रीय राजकारणात उतरवण्याची काँग्रेसची भूमिका आहे.

हेही वाचा: गुजरातच्या मोरबीमधून ATS ने जप्त केलं १२० किलो हेरॉईन

राजीव सातव यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्याची पक्षाची भूमिका आहे. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना या जागी संधी दिली पाहिजे असा मतप्रवाह पक्षात होता. विधानपरिषदेच्या या जागेसाठी 29 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे, तर 16 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे

loading image
go to top