गुजरातच्या मोरबीमधून ATS ने जप्त केलं १२० किलो हेरॉईन | Morbi Drugs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujarat drugs

गुजरातच्या मोरबीमधून ATS ने जप्त केलं १२० किलो हेरॉईन

अहमदाबाद: गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबीच्या (Morbi) जीनजुदा गावातून १०० किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त (Heroin seizes) केलं आहे. "ड्रग्जचा (Drugs) राक्षस संपवण्यासाठी गुजरात पोलीस आघाडीवर राहून नेतृत्व करत आहेत. गुजरात एटीएसने आतापर्यंत १२० किलो ड्रग्ज जप्त केलं आहे" असे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं.

सप्टेंबर महिन्यात कच्छच्या मुद्रा बंदरातून डीआरआयने ३ हजार किलो हेरॉईन जप्त केलं होतं. त्याची किंमत २१ हजार कोटींच्या घरात आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएसने ही कामगिरी केली आहे. मुद्रा बंदरातील हेरॉईन दोन कार्गो कंटेनरमधून भारतात आले होते. या ड्रग्ज प्रकरणाचा संबंध इराणशी आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: T-20 WC: ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचं अजब सेलिब्रेशन

या प्रकरणात डीआरआयने चेन्नई स्थित एक जोडपं आणि कोईमबतोरमधून एका आरोपीला अटक केली होती. आता एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. गुजरातच्या मुद्रा बंदरात दोन कंटेनरमध्ये सापडलेलं हे ड्रग्ज कंदहार स्थित हसन हुसैन लिमिटेडने निर्यात केलं होतं. विजयवाडा स्थित आशी ट्रेडिंग कंपनीने हे हेरॉईन आयात केलं होतं.

हेही वाचा: महिलेने रिक्षा चालकाला दिली कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या कारण...

"या हेरॉईन प्रकरणात एटीएसने तीन जणांना अटक केली आहे. या हेरॉईनची किंमत ६०० कोटीच्या घरात आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी समुद्रमार्गे हे हेरॉईन आणल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानी बोटीमधून त्यांना ही ड्रग्जची डिलव्हरी मिळाली" असे डीजीपी आशिष भाटीया यांनी सांगितले.

loading image
go to top