शिवसेनेने सुनील शिंदेंना का संधी दिली? संजय राऊतांनी सांगितलं कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेने सुनील शिंदेंना का संधी दिली? संजय राऊतांनी सांगितलं कारण...

शिवसेनेने सुनील शिंदेंना का संधी दिली? संजय राऊतांनी सांगितलं कारण...

मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी (Mlc election) शिवसेनेने सुनील शिंदे (Sunil shinde) यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांच्याजागी सुनील शिंदे यांना संधी मिळाली आहे. रामदास कदम यांच्यावर पक्षनेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभुमीवर सुनील शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने माध्यमांनी आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्याशी संवाद साधला.

"सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम सुद्धा कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचं नेतृत्व केलं, काम केलय. सुनील शिंदे वरळीचे आमदार होते. आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी जागा सोडली. हा सुद्धा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्यागाचं, निष्ठेचं स्मरण ठेवलं आणि त्यांना संधी दिली" असे संजय राऊत म्हणाले. "रामदास कदम यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलय. आमदार, मंत्री होते. ते आमचे सहकारी आहेत" असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी येणार, गॅलरीत कपडे वाळत घालू नका, पोलिसांचा आदेश

कृषी कायदे रद्द करण्याबद्दल संजय राऊत म्हणाले...

"दीडवर्षापासून शेतकरी ज्या तणावाखाली, दबावाखाली, दहशतीखाली होता, ते दहशतीचं जोखड आता निघालय. कंगना रणौत, विक्रम गोखले म्हणतात, ते स्वातंत्र्य नाही. त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी आहे असे राऊत म्हणाले. तुमच्या मनावर असलेलं जोखड फेकणं ते स्वातंत्र्य असते" असे राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा: भाजपामध्ये 'या' आयारामाना 'अच्छे दिन', सहज मिळाली आमदारकी-खासदारकी

"कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणारा पंजाब आणि हरयाणाचा शेतकरी मागे हटला नाही. हे फक्त दोन राज्याचे शेतकरी नव्हते. हे शेतकरी संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांच प्रतिनिधीत्व करत होते. अखेर सरकाराला झुकावं लागलं. तीन काळे कायदे रद्द झाले. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे. भीकेत मिळालेलं नाही" असे राऊत म्हणाले.

loading image
go to top