bjp-flag
bjp-flagsakal

भाजपामध्ये 'या' आयारामाना 'अच्छे दिन', सहज मिळाली आमदारकी-खासदारकी

40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या राजहंस सिंह यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांची थेट विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे.
Published on

मुंबई: भाजपाने (Bjp) आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी (Mlc election) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईतून राजहंस सिंह (Rajhans singh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतून चित्रा वाघ (Chitra wagh) यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. पण राजहंस सिंह यांनी बाजी मारली आहे. राजहंस सिंह यांना भाजपामध्ये प्रवेश करुन पाच वर्षही पूर्ण झालेली नाहीत. पण त्याआधीच थेट विधानपरिषदेवर संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या राजहंस सिंह यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांची थेट विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. मागील काही वर्षात वर्षात भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना अच्छे दिन आल्याचे पहायला मिळत आहे.

bjp-flag
कमला हॅरिस दीड तासांसाठी झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना सभागृहात सहज संधी मिळत असल्यामुळे वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. कारण संघर्षाच्या काळातील या नेत्यांचे योगदान आणि साथ यामुळेच भाजपाच आज विस्तार होऊ शकला.

bjp-flag
आपण सत्याला ओळखणाऱ्या ऋषींचे वंशज आहोत - मोहन भागवत

आतापर्यत भाजपने 'या' आयारामाना  दिली संधी

प्रवीण दरेकर मूळचे मनसेचे आहेत. मनसेमधून २००९ ते २०१४ पर्यंत ते आमदार होते. आधी त्यांना परिषदेवर पाठवले आता ते विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आहेत.

प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवले.

४० वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या राजहंस सिंह यांनी २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केला. उपगनरातील आश्वसक उत्तर भारतीय चेहरा आहे. त्यांना आता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपाने प्रदेश उपाध्यक्ष बनवले व राष्ट्रीय कार्यकारणीवर संधी दिली.

काँग्रेसमधून आलेल्या नारायण राणे यांना भाजपने आधी त्यांना राज्यसभेवर पाठवले आणि आता थेट केंद्रीय मंत्री आहेत.

२०१९ मध्ये भाजपात प्रवेश करणाऱ्या भारती पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे.

कपिल पाटील यांनी २०१४ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सलग दुसऱ्यांदा खासदार असलेल्या कपिल पाटील आता केंद्रात मंत्री आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com