Shivsena: ठाकरे गटाच्या आजी-माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये तुफान राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: ठाकरे गटाच्या आजी-माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये तुफान राडा

Shivsena: ठाकरे गटाच्या आजी-माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये तुफान राडा

मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आजी आणि माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये काल रात्री तुफान राडा झाल्याची घटना घडली. चेंबूर कॅम्प परिसरातील उद्धव ठाकरे गटाच्या शाखा 154 मध्ये हा गोंधळ झाला आहे.

शाखेच्या जागेवरुन आजी-माजी महिला शाखाप्रमुखांमध्ये काल रात्री चांगलीच जुंपली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन उद्धव ठाकरे गटाचे आजी-माजी महिला शाखा प्रमुखांसह सर्व कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन गेले.

आजी आणि माजी महिला शाखाप्रमुखांच्या या भांडणात काही पुरुष शिवसैनिकांवरही चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. सध्या चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Uddhav ThackerayMumbai