
जितेंद्र विसपुते
छत्रपती संभाजीनगर : कोरोनानंतर टाइप १ मधुमेहाचे (टी१डी) प्रमाण वाढत असल्याचे संशोधनांतून समोर आले. तज्ज्ञांच्या मते, विषाणू संसर्गामुळे प्रतिकारशक्ती बदल होऊन शरीराच्या बीटा पेशींवर हल्ला होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मुलांमध्ये मधुमेह आढळत आहे. यावर अमेरिकेने नुकतेच संशोधन सुरू केले असून याची धुरा शास्त्रज्ञ डॉ. हर्षराज सुभाष शिंदे (सोलापूर) आणि डॉ. अंबिका शिंदे (परभणी) या दांपत्याच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. वर्ष २०३१ पर्यंत हे संशोधन चालणार आहे.