Maharashtra Independence Day 2026
esakal
देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू झाली असून, यंदा १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. महाराष्ट्रातही या दिवसाची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सकाळी एकाच वेळी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार, याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.