Maharashtra Weather Update : मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा; उन्हाचा चटका अधिक जाणवणार; यंदा उन्हाळ्यात कसं असेल तापमान?

IMD Predicts Higher Temperatures and Heatwave Risk : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिना सुसह्य राहण्याची शक्यता असून, मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा देखील कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
IMD Predicts Higher Temperatures and Heatwave Risk

IMD Predicts Higher Temperatures and Heatwave Risk

esakal

Updated on

यंदा उन्हाळ्यात (मार्च ते मे) कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागात उन्हाचा अधिक चटका जाणवणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिना सुसह्य राहण्याची शक्यता असून, मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा देखील कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी शनिवारी (ता. २८) जाहीर केला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या. यातच देशाचे किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार, सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना तिसऱ्या क्रमांकावर होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com