देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं, भागवतांच्या अखंड हिदुस्थानच्या कल्पनेचं स्वागत I Sanjay Raut, Mohan Bhagwat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political News

मोहन भागवतांच्या अखंड हिदुस्थानच्या कल्पनेचं स्वागत, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं, भागवतांच्या अखंड हिंदुस्तानच्या कल्पनेचं स्वागत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांचा आम्हाला सन्मान आणि आदर आहे. भागवतांच्या अखंड हिदुस्थानच्या कल्पनेचं स्वागत आहे. आम्हालाही अखंड भारत हवा आहे. अखंड हिंदुस्तान करण्यास विरोधकांना कुणीही रोखलेलं नाही, मात्र त्याआधी काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करुन त्यांची घरवापसी करा, असा सल्ला शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारला दिला आहे. देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जात असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली आज ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधाला.

हेही वाचा: 'आम्ही बंगल्यात चपला सोडल्या', पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर संभाषण व्हायरल

यावेळी राऊतांनी केंद्र सरकारवर (Central Govt.) टीका करताना ते म्हणाले, विरोधकांकडून देशाला पुन्हा फाळणीच्या दिशेने ढकललं जात आहे. समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाची ही निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. अखंड हिंदुस्थान करण्याच्या मोहन भागवत (Mohan Bahgwat) यांच्या कल्पनेचे स्वागत आहे. मात्र त्याआधी काश्मिरी पंडितांची घरवापसी करण्यावरही लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. रामनवमीला (Ramnavami) पहिल्यांदा रस्त्यावर वाद पहायला मिळाला, हे गंभीर आहे, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपाच्या करीट सोमय्या यांच्या चौकशी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणातील आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. तुम्ही न्यायालयांचे निकाल पहा कोणताही आरोपी निर्दोष नाही हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यासंदर्भातील आरोपीचींही कसून चौकशी व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सुचवले. तात्पुरत्या जामिनावर सुटलेला आरोपींना संयम बाळगायला हवा, असा टोलाही त्यांनी नाव न घेता सोमय्यांना लगावला आहे. आयएनएस विक्रांत संदर्भातील प्रकरणात तुम्ही पैशाचा अपहार केला आहे. पोलिस स्थानकात तसे आरोप पत्र दाखल झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजून तपास सुरु आहे. भविष्यात यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर येणार आहेत. तुमचे पितळ उघडे पडले आहे, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: संजय राऊतांवर कारवाई झालेला पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?

Web Title: India Towards Partition Again Says Sanjay Raut Reaction Welcome Mohan Bhagwat Idea Of Unbroken Hindustan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top