
'आम्ही बंगल्यात चपला सोडल्या', पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर संभाषण व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याच्यावेळी सदावर्ते यांच्या संपर्कात असलेला नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गिरीधर गोडबोले याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या यांत्रिकी विभागातील कर्मचारी आहे. (Gunratna Sadavarte colleague arrested in Nagpur)
संदीप गोडबोलेला अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांना व्हॉट्सअॅप संभाषण हाती लागलं आहे. त्यामध्ये हा हल्ला पूर्वनियोजीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा: सदावर्तेंच्या सहकाऱ्याला नागपुरात अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
शरद पवार याच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या अभिषेक पाटील याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हाती अभिषेक पाटील आणि नागपुरातून ताब्यात घेतलेला संदीप गोडबोल याचे व्हाॅट्सअॅप चॅट हाती लागले आहेत.
अभिषेक - हॅलो
संदीप - बोल अभिषेक
अभिषेक - तिथेच जाऊ का ?
संदीप - हा.. तिथेच जायचंय
अभिषेक - आम्ही त्या बंगल्याच्या इथे चपला सोडल्या, आम्ही अगोदर आलो, आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लय लोक आलेत. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब, करावं तर सगळं आपणचं करावं, बाकीच्यांनी निवांत बसावं. इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं, मुदलियार पाटील आतच आलेत. रात्रभर मैदानात होते. सकाळी ९ पर्यंत आंघोळ करून पण येऊ नये का ?
संदीप - आता कुठे आहेत तुम्ही? कुठे आहात आता?
अभिषेक - हा इथे सगळ्या महिला घेतल्यात, डायरेक्ट त्यांना तिकिटांना पैसे दिलेत. तिकिट काढलेत निघालेत सगळे, ७० ते ८० महिला आणि माणसं आहेत १०० ते २००
संदिप - महालक्ष्मी पेट्रोलपंप कुठे आहे विचारा
अभिषेक - पेट्रोलपंपावर मीडिया आली.
संदिप - मीडिया आली आहे?
अभिषेक - चला मीडिया आली भाऊ
संदीप - हो
Web Title: Whatsapp Conversation Goes Viral In Case Of Sharad Pawar Bungalow Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..