
नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी केंद्र’ (आयआयसीटी) मुंबईतील गोरेगाव येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.