esakal | राष्ट्रीय विज्ञान अकादमीत दोन मराठी शास्त्रज्ञांना मानद सदस्यत्व
sakal

बोलून बातमी शोधा

Indian National Science Academy

राष्ट्रीय विज्ञान अकादमीत दोन मराठी शास्त्रज्ञांना मानद सदस्यत्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिल्ली येथील प्रतिष्ठीत भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीतर्फे (इन्सा) दोन मराठी शास्त्रज्ञांना मानद सदस्यत्व (फेलो) बहाल करण्यात आले आहे. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) प्रा. संजीव धुरंधर, तर मुळचे जळगावचे आणि सध्या भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतील (आयसर भोपाळ) रसायनशास्त्राचे प्रा. नितीन तुकाराम पाटील यांची अकादमीने फेलो म्हणून निवड केली आहे.

हेही वाचा: रामदास कदम, अनंत गीतेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण नाही?

इन्साचे फेलो झाल्यामुळे या दोन शास्त्रज्ञांना देशातील वैज्ञानिक ध्येय धोरणे निश्चित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येणार आहे. इन्साच्या वतीने देशभरातील ४० प्राध्यापकांची किंवा शास्त्रज्ञांची फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्व क्षेत्रात कार्यरत संशोधकांची यात निवड करण्यात आली आहे. प्रा. धुरंधर यांची निवड करताना समिती म्हटले आहे की, ‘‘संजीव धुरंधर हे भारतातील गुरुत्वीय लहरी संशोधनाचे प्रणेते आहेत आणि त्यांनी योगदान दिले आहे. गेल्या तीन दशकांमध्ये या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. गुरुत्वील लहरींच्या शोधासाठी आवश्यक मूलभूत तंत्र आणि पद्धतींचा विकास त्यांनी केला आहे.’’ तर प्रा. पाटील यांची निवड करताना समिती म्हणते,‘‘सुवर्ण उत्प्रेरित कार्बोफिलिक सक्रियता आणि क्रॉस-कपलिंगसंबंधीच्या संशोधनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जीवशास्त्र आणि भौतिक विज्ञानातील नैसर्गिक उत्पादनांच्या संश्लेषणासाठी त्यांचे हे संशोधन महत्त्वपूर्णच आहे.’’

हेही वाचा: शाहरुखचं टेन्शन वाढलं, आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला

प्रा. धुरंधर यांचे संशोधन :

  • गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी सैद्धांतिक संशोधने

  • अत्यंत क्षीण असलेल्या गुरुत्वीय लहरी संपादित करण्यासाठी त्यांनी मूलभूत गणितीय सूत्रे आणि कार्यप्रणाली विकसित केली

प्रा पाटील यांचे संशोधन :

  • नैसर्गिक मुलद्रव्यांचा संप्रेरक म्हणून उपयोग होत असल्याचे सिद्ध केले

  • सोन्याचा रासायनिक अभिक्रियेसाठी वापर शक्य

  • एकजिनसी सोन्याच्या संश्लेषणातून वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन

loading image
go to top