esakal | रामदास कदम, अनंत गीतेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण नाही? | Shivsena
sakal

बोलून बातमी शोधा

रामदास कदम, अनंत गीतेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण नाही?

रामदास कदम, अनंत गीतेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण नाही?

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: येत्या १५ ऑक्टोबरला मुंबईत षणमुखानंद हॉलमध्ये (Shanmukhanand Hall) शिवसेनेचा (shivsena) दसरा मेळावा (Dussehra rally) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेता रामदास कदम (Ramdas kadam) यांची अनुपस्थिती दिसू शकते. निमंत्रितांच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्याचे संकेत मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे पक्षनेतृत्व रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांनी ही क्लिप समोर आणली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचे बोलले जाते. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप आहे. त्यामुळे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना दसरा मेळाव्यापासून दूर ठेवण्यात येऊ शकते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: शाहरुखचं टेन्शन वाढलं, आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला

"दसरा मेळाव्यासाठी आम्ही मर्यादीत लोकांना निमंत्रित करत आहोत. यात मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आम्ही कोविड-१९ च्या प्रोटोकॉल्सचे पालन करत आहोत. प्रत्येकाला सामावून घेणे शक्य नाही. पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबत रामदास कदम यांचे नाव निमंत्रितांच्या यादीतून वगळले जाऊ शकते" असे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: पवार चारवेळा मुख्यमंत्री, पण सलग पाच वर्षे नाही; फडणवीसांचा पलटवार

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांना सुद्धा दसरा मेळाव्यापासून लांब ठेवण्यात येऊ शकते असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. मध्यंतरी अनंत गीते यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती.

loading image
go to top