रायगडावर येणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद - संभाजीराजे छत्रपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब - संभाजीराजे छत्रपती

रायगडावर येणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद - संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ही माहिती दिली. यात म्हटलं की, "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दुर्गराज रायगड भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे."

हेही वाचा: पालकमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ; धनंजय महाडिक यांचा आरोप

संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला रायगडास भेट देणार आहेत. ही बाब आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

loading image
go to top