
मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वे संपर्क बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने तीन नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांमध्ये भावनगर-अयोध्या एक्सप्रेस ट्रेन, रेवा-पुणे एक्सप्रेस ट्रेन, जबलपूर-रायपूर एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे. पहिली ट्रेन महाराष्ट्रातील भावनगर ते अयोध्या (उत्तर प्रदेश) दरम्यान धावेल, जी मध्य प्रदेशातून जाईल. दुसरी ट्रेन मध्य प्रदेशातील रेवा आणि महाराष्ट्रातील पुणे दरम्यान धावेल. तिसरी ट्रेन छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि मध्य प्रदेशातील जबलपूर दरम्यान धावेल.