
मुंबई : भारतीय रेल्वेच्या ‘नवरत्न’ उपक्रम असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) कडून मुंबईकरांसाठी आकर्षक आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ‘जपानचे अल्पाइन वंडर्स अँड हेरिटेज’ या विशेष दौऱ्याची सुरुवात ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतून होणार असून, १० दिवसांच्या या प्रवासात प्रवाशांना जपानच्या समृद्ध सांस्कृतिक आणि निसर्गवैभवाचा अनुभव घेता येणार आहे.