

Indian Railway Rules
Esakal
मुंबई : भारतीय रेल्वेच्या गतिमान एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट बुकिंग करताना नवीन अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा ॲपवर गतिमान एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना सक्तीचे जेवण घ्यावे लागत आहे. जेवण नकोचा पर्याय नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.