Indigo Flight Chaos Hits MLAs
esakal
इंडिगो एअरलाईन्सची विमानं सतत रद्द होत असल्याने देशभरात मोठा गदाराळ निर्माण झाला आहे. अनेक विमानतळांवर गोंधळ बघायला मिळतो आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही नाराजी पसरली आहे. या गोंधळाचा फटका आता थेट राज्यातील आमदारांनाही बसला आहे. नागरपूरला अधिवेशनासाठी जाणाऱ्या अनेक आमदारांचं विमान तिकीट रद्द झालं आहे. त्यामुळे या आमदारांना नागपूरला पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.