Indore Bus Accident: दुर्घटनेतील 12 मृतदेह हाती, सर्व मृतांची ओळख पटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indore Bus Accident

Indore Bus Accident: दुर्घटनेतील 12 मृतदेह हाती, सर्व मृतांची ओळख पटली

मध्यप्रदेश मधील इंदौर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. नदीतून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक व वाहक देखील आहेत.

मध्यप्रदेश सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

मध्यप्रदेश सरकारडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४-४ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. आसंदर्भातील माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली आहे.

भोपाळ : इंदूरहून अंमळनेरकडे (Indore Bus Accident) येणाऱ्या एसटीमहामंडळाच्या बसला धार येथे भीषण अपघात झाला असून, या घटनेत बसच्या चालक वाहकासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातासंदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर (Help Line Numbers) कार्यान्वित केला आहे. त्याशिवाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी आठ जणांची ओळख पटवण्यात आतापर्यंत यश आले आहे. (Indore Amalner ST Bus Accident Live Update)

राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेत अनेक प्रवाशांच्या मृत्युची बातमी ऐकून दुःख झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबांप्रती राष्टपतींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर

मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर, जखमींना 50,000 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

घटनेच्या चौकशीचे आदेश - शिवराज सिंह चौहान

मध्यप्रदेशातील अपघातात आतापर्यंत 13जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, आपण स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्कात असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आली असल्याचे शिवराज सिंह यांनी स्पष्ट केले.

मध्यप्रदेशातील दुर्घटना दुर्देवी - जयंत पाटील

मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

महामंडळाकडून आर्थिक मदत जाहीर

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाच्या बस अपघातात मृत्युमुखी पडेलल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.

गिरीश महाजन इंदौरकडे होणार रवाना

दरम्यान, मध्य प्रदेशात घडलेल्या एसटी अपघातानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन दुपारी तीन वाजता विमानाने रवाना होणार असून, पाचवाजेपर्यंत ते घटनास्थळी दाखल होणार आहे.

अपघातील 8 जणांची मृतांची ओळख पटली

1.चेतन राम गोपाल, रा. राजस्थान

2. जगन्नाथ हेमराज जोशी वय 70 वर्ष, मल्हारगड उदयपूर राजस्थान

3. प्रकाश श्रवण चौधरी वय 40 वर्ष, अमळनेर जळगाव महाराष्ट्र (वाहक)

4. नीबाजी आनंदा पाटील वय 60 वर्ष, पिळोदा अमळनेर जळगाव

5. कमलाबाई निबाजी पाटील, वय 55 वर्ष, पिळोदा अमळनेर जळगाव

6.चंद्रकांत एकनाथ पाटील वय 45 वर्ष, रा. अमळनेर जळगाव (एक से सहा क्रमांकावरील मृतांची ओळख त्यांच्या आधार कार्डद्वारे करण्यात आली. (चालक)

7. श्रीमती अरवा मुर्तजा बोरा वय 27 वर्ष, मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्र

8. सैफुद्दीन अब्बास, नूरानी नगर इंदूर

इंदोर अमळनेर बस मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर अपघातग्रस्त झाली असुन मदत कार्य सुरु आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तसेच जळगाव जि का नियंत्रण कक्षाशी 02572223180/02572217193 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट

दरम्यान, मध्य प्रदेशातील बस अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असून, स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्टटले आहे.

मध्य प्रदेश प्रशासनासोबत संपर्कात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्य प्रदेशातील एसटी बसच्या अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असूून, जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात असून शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Indor Amalner Bus Accident Update State Transport Issue Helpline Numbers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..