इंदोरीकरमहाराजांचे टोकाचे पाऊल.. दोन दिवस वाट पाहीन, नाही तर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मी कोणतंही वाक्य खोटं बोललेलो नाही. जे आहे ते ग्रंथांमध्ये आहे. त्याचाच कीर्तनातून आधार घेतला. माझ्या पदरचं काही नाही. इतक्या मोठ्या कीर्तनात एखादं वाक्य चुकू शकतं. असंही त्यांनी कबूल केलं. पण त्या वाक्याबद्दल वाद सुरू असल्याने असल्याने महाराज व्यथित झाले आहेत.

नगर ः निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांच्यामागे कोर्टाचे लचांड लागले आहे. नगरच्या समितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. सम आणि विषम स्थितीला समागमाबाबत इंदोरीकरांनी भाष्य केल्याचे एका यू ट्यूब चॅनलने दाखवले होते. त्यावरून हा वाद उफाळला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही महाराजांचे हे वाक्य आक्षेपार्ह आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे भाष्य केले आहे. त्यामुळे इंदोरीकरांचे समर्थक संतापले आहेत. काहीजणांनी आय सपोर्ट इंदोरीकर अशी फेसबुकसह सोशल मीडियात मोहीम सुरू केली आहे. 
इंदोरीकरमहाराजांच्या समर्थनार्थ अकोलेकरांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, महाराजांनीच त्यांना तसे करण्यापासून रोखले. 

या यू ट्यूबवाल्यांची शाळाय 
गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळाबाबत इंदोरीकरमहाराजांनी कीर्तनातून भाष्य केले आहे. इतकी वर्षे झाली मी कीर्तन करीत आहे. लोकांसाठी काय केले, याचं कुणालाच देणंघेणं नाही. काही लोकांना मला कशात तरी अडकावायचं आहे. मात्र, मी कशातच सापडत नसल्याने ही असली प्रकरणं ते काढीत आहेत. यू ट्यूब चॅनलवाल्यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ दाखवून लाखो कमावले. त्यांच्या चॅनलला बघा किती लाईक्स आहेत. आमच्याच कीर्तनावर पैसे कमवायचे आमच्याच काड्या करायच्या हे काही बराबर नाही. त्यांनी कितीही संपवण्याचाडाव आखला असला तरी मी काही संपणारा नाही. 

मी काय खोटं बोललं... 
मी कोणतंही वाक्य खोटं बोललेलो नाही. जे आहे ते ग्रंथांमध्ये आहे. त्याचाच कीर्तनातून आधार घेतला. माझ्या पदरचं काही नाही. इतक्या मोठ्या कीर्तनात एखादं वाक्य चुकू शकतं. असंही त्यांनी कबूल केलं. पण त्या वाक्याबद्दल वाद सुरू असल्याने असल्याने महाराज व्यथित झाले आहेत. आता आपली कॅपिसीटी संपलीय. दोन दिवस वाट बघायची नाही तर सरळ फेटा खाली ठेवून शेती करायची, असा टोकाचा निर्णय त्यांनी बोलून दाखवला. त्यांच्या या वाक्याने भाविकही अवाक झाले. 

महाराजांसाठी सोशल मीडियात चळवळ 
महाराजांवर कशाला कारवाई करता, तुम्हाला लईच कायदा कळत असेल तर अगोदर गुरूचरित्र कुणी लिहिलं त्याला शोधा. त्याच्यावर गुन्हे दाखल करा. महाराज त्या ग्रंथात जे आहे ते बोलले. एकट्या महाराजांवर कशाला खार खाता. महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, अशी प्रकारची समर्थनाच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indorekarmaraj is angry wait for two days, otherwise I will do farming