Mission Lotus: इंदुरीकरांच्या सासुबाई सरपंच झाल्यानंतर गेल्या 'या' पक्षात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indurikar Maharaj Mother in Law

Mission Lotus: इंदुरीकरांच्या सासुबाई सरपंच झाल्यानंतर गेल्या 'या' पक्षात

Indurikar Maharaj Mother in Law : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरपंच बनल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांकडून ही सरपंचपदाची निवडणूक लढवलेली नाही, तर अपक्ष म्हणून त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला आणि ग्रामस्थांनी त्यांच्यावर पूर्णतः विश्वास दाखवला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा दारुण पराभव केला.

इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता शशिकला पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जाण्याची भूमिका शशीकला पवार यांनी जाहीर केली. अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणाऱ्या शशिकला पवार यांनी गावच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. विशेष बाब म्हणजे विखे पाटील गटाचाच शशीकला यांनी निवडणुकीत पराभव केला होता.

हे ही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, किर्तनाच्या क्षेत्रात नावाजलेलं नाव असलेले प्रसिद्ध हभप निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर हे शशिकला पवार यांचे जावई असल्यानं त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर निश्चित दिसून आला आहे. इंदुरीकर महाराज ग्रामीणभागात आपल्या खास विनोदी शैलीतील किर्तनासाठी ओळखले जातात.

हेही वाचा: Yogesh Kadam: आमदार योगेश कदमांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात; कबुली देत म्हणाला...

निवडणुकीनंतर थोरात गटाने सुद्धा शशिकला शिवाजी पवार आमच्या गटात असल्याचा दावा केला होता. मात्र आता भाजप प्रवेशानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Indurikar Maharaj